Ad will apear here
Next
तेजोमय
भारतात प्राचीन काळापासून अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले. जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या तत्त्ववेत्त्यांपैकी गौतम बुद्ध, चार्वाक, कबीर, मीराबाई, महर्षी योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती, विवेकानंद आणि ओशो अशा आठ तत्त्ववेत्त्यांची ओळख माधवी कुंटे यांनी ‘तेजोमय’मधून करून दिली आहे. 

वैदिक कर्मकांडातून लोकांची सुटका करून त्यांना जातीभेदरहित चांगले जीवन जगण्याचा मार्ग गौतम बुद्धांनी दाखविला. लोकांना नीतीयुक्त आणि विवेकवादी आचरणाची शिकवण देणारे चार्वाक यांचे तत्त्वज्ञान यात आहे. कृष्णाला आपला सखा, पती मानलेल्या मीराबाई म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार असल्याचे लेखिका सांगतात. संत मीराबाई म्हणजे मूर्तिमंत भक्तियोग कशा ठरल्या, हे त्यांच्या चरित्रकथेतून समजते. 

कर्मकांड आणि कट्टरतेला फटकारणारे संत कबीर, प्रकांड तेजस्वी बुद्धिमत्ता आणि वैदिक आणि वैदिक तत्त्वज्ञानाचे सखोल ज्ञान असणारे विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती यांचे तत्त्वज्ञान, मानवजात उत्क्रांत व्हायला हवी, हा तत्त्वज्ञानाचा गाभा मांडणारे महर्षी योगी अरविंद, संसारात राहून ध्यानमार्गाने आत्मिक शक्तीचा विकास करीत अखेर मुक्तिलाभाकडे जाण्याचे तत्त्वज्ञान मांडणारे आचार्य रजनीश अशा तत्त्ववेत्त्यांची माहिती व महती यातून कथन केली आहे.  

पुस्तक : तेजोमय
लेखक : माधवी कुंटे
प्रकाशक : भरारी पब्लिकेशन्स 
पाने : १२८ 
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZXKCB
Similar Posts
‘तेजोमय’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे : पुणे डॉक्टर्स असोसिएशन (पीडीए) यांच्या वतीने यंदाच्या तेजोमय दिवाळी अंकाचे २१ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशन झाले. यंदाचा अंक हृदयरोगाशी संबंधित माहिती देणारा हृदयभान विशेषांक आहे. पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून डॉ. जगदीश हिरेमठ आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा
धडधड वाढते ठोक्यात... टिकटिक वाजते डोक्यात... पुणे डॉक्टर्स असोसिएशनतर्फे यंदा ‘तेजोमय’ हा दिवाळी विशेषांक हृदयरोग-हृदयारोग्य हा विषय घेऊन प्रसिद्ध करण्यात आला आहे. हृदयरोग होऊ नये यासाठी जीवनशैली कशी ठेवायची आणि हृदयरोग झालाच तर भांबावून न जाता नेमकं काय करायचं, याचं मार्गदर्शन करणारे तज्ज्ञांचे लेख, मुलाखती या अंकात आहेत. तसेच अन्य साहित्यिक मेजवानीही आहेच
कवी, लेखक जगदेव भटू यांना राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर भिवंडी : नवी दिल्लीतील डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन तथा आदीलीला फाउंडेशन यांच्या वतीने कवी, लेखक जगदेव भटू यांना यंदाचा राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ सप्टेंबरला नवी दिल्लीत अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भटू यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
प्रेरणा आयुष्य सगळेच जण जगत असतात; पण ते रडत-कुढत जगायचे की हसत-खेळत हे प्रत्येकाच्या स्वभावावर व विचारांवर अवलंबून असते. म्हणूनच आनंददायी जीवनासाठी विनोद अ. बांदोडकर यांनी ‘प्रेरणा’ या पुस्तकातून केलेले लेखन मार्गदर्शक ठरते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language